महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:34 AM2018-12-28T11:34:15+5:302018-12-28T11:38:13+5:30

महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी माघार घेतली आहे

NCP's withdrawal of Mayor's post | महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची माघार

महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची माघार

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी माघार घेतली आहे. सभागृहात राष्टÑवादी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची महापौर पदी निवड निश्चित मानली जात आहे. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीने उमेदवारीच दाखल केलेली नाही. काँग्रेसच्या रुपाली वारे याही माघार घेणार आहेत. त्यामुळे या पदावर भाजपच्या मालन ढोणे यांची निवड होण्याची शक्यता आहे. पत्रकारांना या सभेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.

महापालिकेत शिवसेना(२४), भाजप (१४), राष्ट्रवादी(१८), काँग्रेस(५), बसपा(४), सपा(१), अपक्ष(२) असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सभागृहात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचा सभात्याग
अहमदनगर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसने बहिष्कार टाकला असून त्यांच्या ५ नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. कोणत्याही जातीयवादी पक्षासोबत जाणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

Web Title: NCP's withdrawal of Mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.