अहमदनगर : आंतराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व विशद करताना कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधन करण्याची गरज आहे, असे राज्याचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे सांगितले.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळदघाट येथील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट (आयबीएमआरडी) संस्थेमध्ये चेन्जिंग टाइम विथ चेन्जिंग माईंड - द डिजिटल ट्रान्सफॉर्मशन इन बिसिनेस रि-इंजिनिअरीग - पोस्ट पेनड्यामिक इरा ऑफ इंडस्ट्री ५.० या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पवार बोलत होते. संस्थेचे विश्वस्त ॲड. वसंत कापरे, महासचिव डॉ. बी. सदानंदा, संचालक (तंत्र) डॉ.पी.एम गायकवाड, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे आदी उपस्थत होते. यावेळी पवार यांनी कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर प्रकाश टाकला. सदर परिषदेसाठी देश व विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत उपसंचालक सुनील काल्हापुरे यांच्यासह संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. परिषद यशस्वी करण्यासाठी आयबीएमआरडी संस्थेचे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी, डॉ. मेघा जैन, प्रा. गणेश अंत्रे, अमोल बेरड, नचिकेत देवधर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
....
फोटो २७ विखे