ऑक्सिजनसाठी स्वयंसेवी संस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:00 PM2021-04-21T13:00:13+5:302021-04-21T13:01:32+5:30

अहमदनगर : ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी काल दुपारपासून  स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे आंदोलन सुरू आहे. ...

NGOs start agitation in front of Collector's office for oxygen | ऑक्सिजनसाठी स्वयंसेवी संस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू

ऑक्सिजनसाठी स्वयंसेवी संस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू

अहमदनगर: ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी काल दुपारपासून  स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे आंदोलन सुरू आहे. भर उन्हात बुधवारीही हे  आंदोलन सुरू आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्नेहालयचे डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हे आंदोलन सुरू आहे. इतरही संघटनाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात नागरिकांच्या आरोग्याची होणारी अडचण लक्षात घेऊन व तातडीने प्रशासनाने पाऊले उचलावीत या मागणीसाठी भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे व शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उपस्थित राहुन  पाठिंबा दिला.
तसेच या संबंधी मा संदिप निचीत साहेब यांच्याशी चर्चा काढुन लवकरात लवकर कायमस्वरुपी व खात्रीशीर तोडगा काढावा यासाठी विनंती केली .

Web Title: NGOs start agitation in front of Collector's office for oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.