यासंदर्भात खोरे यांनी दिलेल्या निवेदनात राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा दाखला दिला आहे. दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन दोनशेहून अधिक आमदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मुंबई येथे पार पडले. नगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडी सदस्यांच्या थेट उपस्थितीत पार पडल्या. नुकतीच पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र असे असताना श्रीरामपूर पालिका प्रशासन ऑनलाईनचा अट्टहास का धरत आहे असा प्रश्न खोरे यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षभरात झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये शहर विकासाच्या विविध विषयांमध्ये सदस्यांना बोलून न देणे, त्यांचे माईक बंद करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे आगामी सभा प्रत्यक्षात घेऊन सदस्यांना विकासाच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी द्यावी. पालिकेत विषय समित्या गठीत झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच विषय सर्वसाधारण सभेपुढे न्यावे लागतात, याकडे खोरे यांनी लक्ष वेधले आहे. पालिका प्रशासन त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--------