पाथर्डी – शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे मोठे खड्डे पडले असून रोजच अपघात होत आहेत,मोठ्या खड्ड्यांचे रुपांतरण डबक्यात झाले असल्याने बेरोजगार तरुणांना या खड्ड्याच्या काठावर मासेमारी व पर्यटन व्यवसायासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करत मनसेच्या वतीने सकाळी १२ वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागच्या कार्यालयात तोडफोड करत पालिका कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात आंदोलन कर्त्यांना उत्तर देण्यासाठी कोणीही नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी कार्यालयातील खुर्च्याची मोडतोड करत अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला चापलाचा हार घातला.शे
जारीच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पाथर्डी शहरातील महामार्गावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,कोरडगाव शेवगाव रोड चौक, तीन हात चौक,माणिकदौडी चौक परिसरातील रस्त्यावर नगर परिषद पाथर्डी व महामार्ग विभागाने खड्ड्यांमध्ये कच्या मातीचा भराव करून त्यावर डांबर टाकले त्यामुळे अल्पावधीत त्या ठिकाणी खड्डे पडून खड्ड्यांचे डबक्यात रुपांतर झाले आहे.
सध्या कोरोना संकटकाळात अनेक तरुणांचे रोजगार हिरावले गेले त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शहरातील खड्ड्यातील छोट्या तळ्यांमध्ये बेरोजगार तरुणांना मत्सपालन व्यवसाय करण्यासाठी व तळ्यांचे काठावर निसर्ग पर्यटन स्थळ विकसित करुन छोट्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा देण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाअध्यक्ष परिवहन अविनाश पालवे,जिल्हाअध्यक्ष विद्यार्थीसेना,शहरसचिव संदीप काकडे,राजू गिरी,सोमनाथ फासे,जयंत बाबर,गणेश कराडकर,एकनाथ सानप,संजय चौनापुरे,एकनाथ भंडारी,रंगनाथ वांढेकर,बाबासाहेब सांगळे यांनी केली आहे.