पाचेगावात शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:30 AM2021-02-23T04:30:25+5:302021-02-23T04:30:25+5:30
शनिवारीही याच ठिकाणी तारांमध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण झाले होते. त्यात पाचेगावातील संतोष भाऊसाहेब साळुंके या शेतकऱ्याचा ऊस आगीतून वाचविण्यात ...
शनिवारीही याच ठिकाणी तारांमध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण झाले होते. त्यात पाचेगावातील संतोष भाऊसाहेब साळुंके या शेतकऱ्याचा ऊस आगीतून वाचविण्यात यश आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी सध्या धास्तावले दिसत आहेत. जयवंत किसन जाधव (रा.गुजरवाडी, ता.श्रीरामपूर) यांची पाचेगाव शिवारात सहा एकर शेतजमीन आहे. दुपारी चारच्या सुमारास शेतातील विजतारांमध्ये घर्षण होऊन तयार झालेले लोळ उसाच्या शेतात पडल्यामुळे एक एकर ऊस आणि प्लास्टीक पाइप आगीत जळून खाक झाले. या शेतकऱ्यांचे सव्वालाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
आग लागलेल्या ऊस क्षेत्रालगत असणारा अठरा एकरांवरील उभा ऊस आणि दीड एकरांतील गहू तरुणांनी आगीपासून वाचविला. आग विझविण्यासाठी बाबासाहेब जाधव, नारायण जाधव, संतोष साळुंके, काशीनाथ साळुंके, सतिश जाधव, उत्तम शेजूळ, गणेश साळुंके, बाबासाहेब वाखुरे, शिवाजी जाधव, कृष्णा साळुंके, नानासाहेब जाधव, महेश जाधव, दीपक जाधव, जयवंत जाधव यांनी परिश्रम घेतले.