कोपरगावात होम कोरंटाईनवर असलेल्या एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 03:50 PM2020-03-25T15:50:58+5:302020-03-25T15:52:39+5:30
कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या कोपरगाव शहरातील एका व्यक्तीस प्रशासनाने होम कोरंटाईनचा सल्ला देत घरात थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याने उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव : कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या कोपरगाव शहरातील एका व्यक्तीस प्रशासनाने होम कोरंटाईनचा सल्ला देत घरात थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याने उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (दि.२५ मार्च) कोपरगाव पोलिसांना गस्ती दरम्यान सदर व्यक्ती जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना आढळून आला. सदर व्यक्तीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या हवाली केले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.