निंबळक : दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने वाळूंज येथील रामसत्य लॉन येथे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केल्याची माहिती माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. या सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले, बाबा पाटील खर्से, रेवणनाथ चोभे, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, सुभाष निमसे, महादेव शेळमकर, बाळासाहेब दरेकर, विजय शेळमकर, नवनाथ हिंगे, राजू हिंगे, विकास म्हस्के, भरत दरेकर, रमेश दरेकर,सुखदेव दरेकर, अनिल मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती माडगे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, नायब तहसील माधव गायकवाड आदी उपस्थित होते.
वाळूंज येथे शंभर बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:21 AM