राहाता येथे कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:49 PM2018-03-29T20:49:28+5:302018-03-29T20:50:04+5:30
चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.
राहाता : चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.
मयताचा भाऊ प्रवीण त्रिंबक डोखे (वय ३९, रा. पुणतांबा) यांनी फिर्याद दिली. प्रवीण यांचा प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) साईबाबा संस्थानमध्ये कामास होता. तो नेहमीप्रमाणे रात्रपाळी संपवून गुरूवारी पहाटे साडेचार वाजता मोटारसायकलवरून (क्रमांक एम. एच. १७/ ए. एन. ६८८५) लोणीकडे जात होता. याचवेळी कार (क्रमांक के ए ०३ ए ई ८७४६) शिर्डीकडे जात होती. तिच्या चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या तवेरा कारला चुकवून मोटारसायकलीस जोराची धडक बसली. यात मोटारसायकलस्वार प्रदीप डोखे जागीच ठार झाले. तर कारमधील एक महिला व पुरूष गंभीर जखमी झाले. मात्र त्यांना तातडीने अपघातस्थळावरून हलविण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाही. राहाता पोलिसानी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. हेडकाँस्टेबल शरद गायमुखे तपास करीत आहेत.
अस्तगाव रस्त्यावर एक ठार
अस्तगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. याबाबत मयत विजय गोविंद आवारे (वय ५५, रा. रांजणखोल) यांचा भाऊ शाम भगवान आवारे याने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय आवारे यांना बुधवारी रात्री अस्तगाव शिवारातून जात असताना अस्तगाव रस्त्यावरील नळे वस्तीवर अज्ञात वाहनाने रात्री एक वाजेपूर्वी धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.