निंबळक : राज्यातील अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना नगर जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत नगर तालुक्यातील आठवड, तसेच निंबळक परिसरात १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला.
आठवड येथे ११६ व निंबळक येथे शुक्रवारी ४६ कोंबड्या मरण पावल्या. या ठिकाणी नगर तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने भेट दिली. पक्ष्यांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.
बाराबाभळी येथे सांळुकी मृतावस्थेत आढळली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात पोल्ट्रीफार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर शहराजवळ पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निंबळक येथे शुक्रवारी राम चव्हाण यांच्या ४६ कोंबड्या मरण पावल्या. याची माहिती मिळताच पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी डॉ. एन.बी धनवडे, डॉ.एस. के.तुंभारे, डॉ. गंगाधर निमसे, डॉ.बी.एन. शेळके, डॉ.अनिल बोठे यांच्या पथकाने पाहणी केली असता ४६ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यातील पाच कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल अद्याप मिळाला नाही.
...
ओळी- १)नगर तालुक्यातील निंबळक येथे मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्या.
२) बाराबाभळी येथे पीपीई कीट घालून फवारणी करताना पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी.
...
१६निंबळक कोंबड्या
१६बाराबाभळी फवारणी
....