कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:08 PM2020-11-29T12:08:07+5:302020-11-29T12:08:52+5:30
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आला असून, शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला.
अहमदनगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आला आहे. शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला.
नगर बाजार समितीत शनिवारी १९ हजार २८६ क्विंटल गावरान, तर ६६६३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यात दोन्ही कांद्याला प्रथम प्रतवारीमध्ये चार हजार रुपयांचा भाव मिळाला.
दुसऱ्या व तिसऱ्या प्रतवारीला १००० ते तीन हजारांपर्यंत भाव मिळाला.
शनिवारच्या लिलावातील भाव (गावरान)- प्रथम प्रतवारी ३१०० ते ४१००, द्वितीय १९०० ते ३१००, तृतीय १००० ते १९००, चतुर्थ ६०० ते १००० रुपये. तर (लाल कांदा)- प्रथम प्रतवारी ३३०० ते ४०००, द्वितीय २२०० ते ३३००, तृतीय ११०० ते २२००, चतुर्थ. ५०० ते ११०० रुपये.