अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:49 AM2018-08-08T11:49:00+5:302018-08-08T11:50:00+5:30

शासनाच्या आॅनलाईन बदल्यांमुळे रखडलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात येणार आहे.

Online Adjustment of Extra 60 Guys | अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन

अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन

अहमदनगर : शासनाच्या आॅनलाईन बदल्यांमुळे रखडलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात येणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असल्याने सोयीची शाळा मिळविण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे.
पटसंख्या घटल्यामुळे जिल्ह्यातील शाळा गेल्या जूनपासून बंद झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील २१ उपाध्यापक अतिरिक्त झाले. तसेच पटसंख्या घटल्याने ९ ,तर पात्र शिक्षक मिळाल्याने ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या पटसंख्येनुसार एकूण ६० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन करण्यासाठी शासनाने मार्चमध्ये मंजुरी दिली होती. परंतु, आॅनलाईन बदल्यांमुळे समायोजन करण्यात आले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून समायोजन रखडले होते. सेवा ज्येष्ठतेनुसार शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. रिक्त असलेल्या जागा आॅनलाईन दाखविण्यात येतील. ज्येष्ठ शिक्षकांना समायोजनात प्राधान्य दिले जाणार आहे.

बीड, लातूरचे शिक्षक अडकले नगरमध्येच
च्आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यातील एकूण ९ शिक्षकांच्या इतर जिल्ह्यामध्ये बदल्या झाल्या. यामध्ये लातूर-६ तर उस्मानाबाद, पुणे आणि बीड प्रत्येकी एक, अशा नऊ शिक्षकांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांनी नगर जिल्ह्यातील या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असे कळविले आहे. त्यामुळे ९ शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांचेही समायोजन करण्यात येणार आहे. 

Web Title: Online Adjustment of Extra 60 Guys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.