साईनगरीत ८ जुलैपासून रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:59+5:302021-07-07T04:26:59+5:30
संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, बीडीओ समर्थ शेवाळे, नगराध्यक्ष शिवाजी ...
संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, बीडीओ समर्थ शेवाळे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक न्याहालदे, मंदिर निरीक्षक भोये, रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मैथिली पितांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर संपन्न होणार आहे.
८ जुलै रोजी साईबाबा रुग्णालयातील रक्तपेढीत सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते पुखराजजी पिपाडा, अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल, मनोज रतिलाल लोढा, नरेश पारख, कमलेश लोढा, नीलेश गंगवाल, नीलेश संकलेचा, संजय लोढा, मनोज कोठारी, भरत संघवी, संदेश पिपाडा, नेमिचंद लोढा, पंकज मुथा, पारस पिपाडा, वीरेश रूणवाल, पंकज लोढा, संदीप वाबळे, प्रसाद तुरकने, रविकिरण डाके, आकाश सोनार यांनी रक्तदानासाठी आवाहन केले आहे. १५ जुलै रोजी शासकीय यंत्रणा तर २२ जुलै रोजी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रक्तदान करणार आहे.