पंचायत समिती सदस्यांना हवाय जादा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:49 PM2019-06-26T13:49:45+5:302019-06-26T13:50:00+5:30
पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात वाढ करावी, मुबलक निधी मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात भेटण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
निंबळक : पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात वाढ करावी, मुबलक निधी मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात भेटण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नगर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. पंचायत समिती सदस्यांनी वारंवार केलेल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या मागण्यासंदर्भात सरकारने ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, संगमनेरच्या सभापती निशा कोकणे, कोपरगावच्या सभापती अनुसया होन, उपसभापती बाळासाहेब लटके, प्रवीण कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पंचायत समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.
अधिवेशन कालावधीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी जाणार आहेत, अशी माहिती नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी दिली.
चौदाव्या वित्त आयोगाची पूर्वीप्रमाणे तरतूद करावी, प्रत्येक पंचायत समिती सदस्याला विविध विकास कामासाठी ५० लाखांपर्यंत निधी मिळावा, मनरेगाच्या कामाची मंजुरी देण्याचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला द्यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घ्यावे, सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी.