Parner Assembly Election 2024 Result Live Updates : पारनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल समोर येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी आघाडी घेतली आहे. तर शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके सध्या पिछाडीवर दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांना होमपिचवरच धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. लोकसभेत ते खासदार झाले. त्यानंतर शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना विधानसभेसाठी पारनेरमधून तिकिट दिलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी
गेल्या विधानसभेला निलेश लंके ठरले होते जायंट किलरपारनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ साली लोकसभेचे सध्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके विजयी झाले होते. त्यांनी पारनेरमधून तीन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजयराव औटी यांचा पराभव करण्याची किमया साधली होती. या निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांना १ लाख ३९ हजार ९६३ मते मिळाली होती. तर विजयकुमार औटी यांना ८० हजार १२५ मते पडली होती.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.