वेतन पथकाने शाईच्या प्रतिबाबतचा वाद संपुष्टात आणावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:32+5:302021-05-05T04:35:32+5:30
वित्त विभागाने मार्च २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार शाईची प्रत सादर केल्याशिवाय जिल्हा कोषागार कार्यालय वेतन देयके मंजूर ...
वित्त विभागाने मार्च २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार शाईची प्रत सादर केल्याशिवाय जिल्हा कोषागार कार्यालय वेतन देयके मंजूर करीत नाहीत. वित्त विभागाच्या कार्यालयामार्फत जिल्हा वेतन पथक कार्यालयास निर्धारित कालावधीत शाईची प्रत उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे कोषागार कार्यालय व वेतन पथक कार्यालयात शाईच्या प्रतीबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनास अधिक विलंब होत आहे. कोषागार व वेतन पथक कार्यालयातील शाईच्या प्रतीबाबत वाद संपुष्टात आणण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी बाबासाहेब बोडखे, प्रा. सुनील पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी आदींनी निवेदन दिले आहे.