पेन्शनरांनी संघर्ष सुरू ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:47+5:302021-08-29T04:21:47+5:30
ईपीएस ९५ पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्यावतीने पेन्शनधारकांच्या प्रश्नावर बुधवारी नगरमध्ये आयोजित जिल्हाव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना राऊत बोलत होते. नेप्ती नाका ...
ईपीएस ९५ पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्यावतीने पेन्शनधारकांच्या प्रश्नावर बुधवारी नगरमध्ये आयोजित जिल्हाव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना राऊत बोलत होते. नेप्ती नाका येथील श्री मार्कंडेय संकुलात हा मेळावा झाला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार डॉ.पी.एन. पाटील, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष शोभा आरस, राष्ट्रीय महिला आघाडी पश्चिम क्षेत्र सचिव सरिता नारखेडे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, राज्याच्या महिला आघाडी अध्यक्ष कविता भालेराव, औरंगाबाद अध्यक्ष जोत्स्ना शर्मा, महाराष्ट्र संघटक डी.एम. पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंगअण्णा जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, औरंगाबाद अध्यक्ष शशिकांत वाडगावकर, नाशिक जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नंदूरबार जिल्हाध्यक्ष गोरख माळी, बीड जिल्हाध्यक्ष हमीदभाई सय्यद, दादाराव देशमुख, जळगाव जिल्हाध्यक्ष जीवन राणे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष राज पाठक आदींसह जिल्ह्यातील पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत म्हणाले की, ईपीएस ९५ पेन्शनरांनी आपल्या तरुणपणी देशासाठी योगदान दिले; मात्र त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यासाठी सरकारनेदेखील त्यांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. पेन्शनर फक्त प्रश्न घेऊन भांडत नसून, त्या प्रश्नांचे निराकारण करण्याचे उत्तरदेखील त्यांच्याजवळ आहे. सरकारने फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी समित्यांवर समित्यांची नेमणूक करण्यात आली; मात्र आता बुध्दी व पॉवरचा उपयोग करून त्यांना न्याय देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
................
फोटो २५ मेळावा
ओळी- ईपीएस ९५ पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्यावतीने आयोजित पेन्शनधारकांच्या प्रश्नावर आयोजित जिल्हाव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत.