ढवळगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अनेक गोष्टी मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यायला हवा. जिद्द, चिकाटी, परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जीवनात निश्चितच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील मेंगलवाडी (राजापूर) येथे पुणे येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी कोंढवा बु. येथील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शालेय उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतील विशेष शिबिराचे ४ ते १० मार्च दरम्यान आयोजन केले होते. समारोप प्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची कामे गावात केली. ग्रामस्वच्छता करण्यात आली. सायंकाळी विविध पथनाट्याद्वारे जनजागृती, कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ग्रामस्थांनीही यानंतर गावात आठवड्यातून एकदा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
विद्यार्थी विकास अधिकारी रमेश गाडेकर, निकीता बगाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, उपसरपंच अनिल गव्हाणे, शंकरराव पाडळे, अशोक ईश्वरे, अशोक मांडगे, सुरेश मेंगवडे, रमेश धावडे, सचिन चौधरी, राजू ढवळे, गंगाराम धावडे, ग्रामविकास अधिकारी एस.पी. कराळे, उषा पठारे, काळूराम गवारे, सचिन धावडे, प्रशांत मेंगवडे, चंद्रकांत मेंगवडे, विवेकानंद मेंगवडे आदी उपस्थित होते.