जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश मिळतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:06+5:302021-01-18T04:18:06+5:30

जामखेड : अपयशाने न खचता प्रयत्नात सातत्य ठेवावे. जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश मिळतेच, असे प्रतिपादन न्यायाधीश पी. ...

Persistence, hard work, perseverance is the key to success | जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश मिळतेच

जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश मिळतेच

जामखेड : अपयशाने न खचता प्रयत्नात सातत्य ठेवावे. जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश मिळतेच, असे प्रतिपादन न्यायाधीश पी. व्ही. सपकाळ यांनी केले.

जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद, हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्रा. प्रकाश तांबे, दत्तात्रय ढाळे, विमल जगताप, प्रा. रमेश बोलभट, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, आदी उपस्थित होते.

लातूर तेथे सहा कि.मी. धावणे स्पर्धेमध्ये प्रथम आलेला व राज्य पातळीवर निवड झालेल्या अजय आबासाहेब म्हेत्रे याचा सन्मान करण्यात आला.

बबन काशीद यांनी संस्कारक्षम मल्ल घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो १७ जामखेड स्टुडंट‌्स

जामखेडच्या श्री नागेश विद्यालयातील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश पी. व्ही. सपकाळ.

Web Title: Persistence, hard work, perseverance is the key to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.