श्रीगोंदा : मागील भांडणाची फिर्याद देण्यासाठी गेलेले अतिक गुलाब हुसेन कुरेशी व माजी उपनगराध्यक्ष अख्तर सिकंदर शेख यांच्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारामारी झाली. याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या घटनेनंतर दोन्ही गटांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मागील भांडणाची फिर्याद देण्यासाठी हे दोघेही पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस ठाण्यातच या उभयतांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे यांनी हस्तक्षेप करून ही मारामारी सोडविली.(तालुका प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यातच दे दणादण
By admin | Published: October 07, 2016 12:32 AM