केडगाव : महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीसाठी आज कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासातच जवळपास २१ टक्के मतदान झाले. उन्हामुळे सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. मतदारांना ने - आण करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. एकुण ७ मतदान केंद्र असुन मतदारांची संख्या ५ हजार ९४ इतकी आहे. पहिल्या दोन तासात १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असुन यात कॉग्रेस व शिवसेना यांच्यातच खरा संघर्ष पाहवयास मिळत आहे. संवेदनशिल मतदान केंद्र असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन अद्यापपर्यत कुठलाच अनुचित प्रकार न घडल्याने मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
महानगरपालिकेच्या केडगावमधील पोटनिवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:02 PM
महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीसाठी आज कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे
ठळक मुद्देहिल्या दोन तासात १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.