सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:30 AM2021-02-23T04:30:21+5:302021-02-23T04:30:21+5:30

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले ...

Pomegranates are more expensive than apples | सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले जाते. मात्र सफरदंचापेक्षा डाळिंबाला सर्वात जास्त दर मिळाला आहे. याशिवाय मोसंबी, संत्र्यांचीही आवक झाली असून या फळांचे भाव स्थिर आहेत.

नगर येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सफरचंदाला ११ हजार व डाळिंबाला १२ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. रविवारीही तोच दर कायम होता. एरवी सफरचंदाचा जास्त दर असतो. मात्र आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. संत्री आणि मोसंबीचे दर सध्या स्थिर आहेत. द्राक्षेही स्वस्त झाले असून पाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर मिळाले आहेत. केळी आणि कलिंगडाला सर्वात कमी दर आहे.

कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. कांद्याला ४४०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. मेथी १० ते १५ रुपये, कोथिंबीर १० रुपये जुडी असा दर आहे. हिरवी मिरची कडाडली असून मिरचीला ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. शेवगा- ३५ रुपये, वांगी-२५ रुपये, गवार-८५ रुपये, कारले-४० रुपये किलो असा दर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

---

फळांचे ठोक दर (रुपये प्रतिक्विंटल)

मोसंबी- ६०००, संत्रा- ६०००, डाळिंब-१२०००, पपई-१२००, रामफळ-६०००, चिक्कू-२५००, द्राक्षे-५०००, अंजिर-४०००, सफरचंद-११०००, कलिंगड-७००, खरबूज-२२००, पेरू-३०००, केळी-७००

------

Web Title: Pomegranates are more expensive than apples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.