तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी नितीन खांदे, रोहित शेटे, केंदळ बुद्रुक येथील श्यामसुंदर तारडे या शेतकऱ्यांच्या शेतात लालऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याने बियाणे फसवणूक झाल्याच्या तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी, राहुरी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात लालऐवजी पांढरा कांदा निघाला. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क व पत्रव्यवहार करूनदेखील या प्रकरणाला संबंधित अधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी क्रांती सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व कंपनीचे परवाने रद्द करावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून न दिल्यास राहुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांसह क्रांती सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
........................
160721\img-20210716-wa0105.jpg
क्रांतीसेनेचा शेतकऱ्यांसह कृषि कार्यालयावर अंदोलनाचा इशारा