ताजनापूर टप्पा दोनसाठी ४० कोटी ४७ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:58 PM2020-03-15T16:58:55+5:302020-03-15T16:59:39+5:30
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
शेवगाव : ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
जायकवाडी जलाशयासाठी शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी बडीत क्षेत्रात गेलेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे जलाशयाभोवती किंवा बुडीत गेलेल्या शेतक-यांच्या जमिनीजवळच पुनर्वसन करून त्यांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनही योजना राबविली गेली. या योजनेद्वारे २० गावांतील ६ हजार ९६० हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी आतापर्यंत ८१ कोटी खर्च करून वितरण कुंड, यांत्रिकी पंपाची उभारणी या घटकांची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु, वितरण व्यवस्थेची कामे होणे बाकी आहेत. यासाठी आमदार राजळे यांनी ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद या सिंचन योजनेसाठी केली आहे.