राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता रोखला : अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:35 PM2019-07-13T13:35:55+5:302019-07-13T13:36:13+5:30

सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले.

Rahuri-Shanishinghapur road blocked: Eighteen villages | राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता रोखला : अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित

राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता रोखला : अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित

सोनई : सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले. अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अठरा गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले असल्याचे टीका करत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अधिका-यांना धारेवर धरले. योजना अपुर्ण असतांना बिले दिल्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी व ठेकेदाराकडून वसुल करून पाणी योजना पुर्ण करा. राहुरी तालुक्यातील अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी माजी आमदार गडाख यांनी केली. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तहसिलदार रूपेश खुराणा, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यकारी अभियंता बी.एस. अहिरे, उप अभियंता नाडगौडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश सोनवणे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, रामनाथ बडे, पानेगावचे सरपंच संजय जंगले, शरद आरगडे, कडुबाळ कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Rahuri-Shanishinghapur road blocked: Eighteen villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.