तळेगावात रांगोळी स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:36+5:302021-02-09T04:22:36+5:30
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांगोळीसह ...
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांगोळीसह संगीत खुर्ची स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहात सहभाग नोंदवला.
मंत्री थोरात यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर श्रीराम मंदिरासमोर संगीत खुर्ची स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. प्राथमिक शाळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘पाणी हेच जीवन’ यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा असलेली रांगोळी काढली. या रांगोळी स्पर्धेद्वारे सामाजिक विषयावर प्रबोधन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या पुढाकारातून या स्पर्धा पार पडल्या. सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी नामदेव दिघे, बाळासाहेब दिघे, सचिन दिघे, उपसरपंच रमेश दिघे, तुकाराम दिघे, मधुकर दिघे, रामचंद्र कांदळकर, विकास गुरव, अमोल दिघे, संपत दिघे, भाऊसाहेब दिघे, नंदकुमार पिंगळे, मच्छिंद्र दिघे, बी. सी. दिघे, रवींद्र दिघे, पोपट दिघे, डॉ. संतोष डांगे, संतोष दिघे, केशव दिघे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याध्यापिका लता रायभान, शिक्षिका श्रीमती काळे यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले.