कोरोना रुग्णवाढीचा वेग तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:22+5:302021-03-08T04:21:22+5:30

अहमदनगर : फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गत महिन्यात दररोज सरासरी शंभर इतकी असणारी रुग्णसंख्या ...

The rate of corona morbidity tripled | कोरोना रुग्णवाढीचा वेग तिप्पट

कोरोना रुग्णवाढीचा वेग तिप्पट

अहमदनगर : फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गत महिन्यात दररोज सरासरी शंभर इतकी असणारी रुग्णसंख्या आता तबब्ल तिनशेंच्यावर गेली आहे. त्यामुळे हा रुग्णवाढीचा दर तिप्पट झाल्याचे दिसते आहे. रविवारीही तब्बल ३६२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५६ आणि अँटीजेन चाचणीत २८ रुग्ण बाधित आढळले.

जिल्ह्यात रविवारी १६६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार आठ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४१ टक्के इतके झाले आहे. रविवारी रुग्णसंख्येत ३६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६३७ इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख १४ हजार २८१ इतक्या रुग्णांच्या चाचण्या झाल्या असून त्यातील पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे १८.५४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ टक्के इतके आहे.

-------------

रविवारी आढळले रुग्ण

नगर शहर -१५२, अकोले -७, जामखेड-७, कोपरगाव-१४, नगर ग्रामीण-१८, नेवासा -११, पारनेर-१३, पाथर्डी-१०, राहाता- २७, शेवगाव -१०, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर-३१, कॅन्टोन्मेंट-६, राहुर-५, संगमनेर-२९, इतर जिल्हा-७.

---------

अशी वाढले कोरोना रुग्ण तारीख फेब्रुवारी मार्च

१ १४१ २१९

२ ४५ २२१

३ १२४ २१५

४ ११० २७१

५ १०९ ३०३

६ १०३ ३२७

७ ६५ ३६२

------------------

कोरोनाची स्थिती

एकूण रुग्णसंख्या : ७७७९९

बरे झालेली रुग्णसंख्या : ७५००८

उपचार सुरू असलेले रुग्ण : १६३७

मृत्यू :११५४

Web Title: The rate of corona morbidity tripled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.