यावेळी सर्व दारू विक्रेत्यांना तंबी देण्यात आली आहे. आजपासून गावात कुठेही दारूविक्री आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर, देशी दारूही जप्त करण्यात आली. लवकरच ग्रामसभेचे आयोजन करून सर्वानुमते हा ठाराव मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल सर्व ग्रामस्थांकडून सरपंच व उपसरपंच यांचे कौतुक केले जात आहे. यापुढेही गावासाठी समाजहिताची कामे करण्याचे आश्वासन सरपंच काळे व उपसरपंच पठारे यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी नूतन सदस्या संध्या काळे, जालिंदर काळे, अलका नानेकर, सुरेश काळे, ग्रामसेवका सारिका वाळुंज, मेजर अशोक खोसे, ईश्वर ठोबरे, रवी पठारे, मधुकर पठारे, धोंडीराम सोनावणे, सचिन चारुडे, संदीप चारुडे, निखिल तोंडे, अरुण पठारे उपस्थित होते.