रस्ता, वीजप्रश्नी मनसेचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:52+5:302021-02-13T04:19:52+5:30
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व शिवा संघटना, युक्रांद यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. राशीनमध्ये पाच किलोमीटरपर्यंतचे केलेले ...
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व शिवा संघटना, युक्रांद यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
राशीनमध्ये पाच किलोमीटरपर्यंतचे केलेले निकृष्ट दर्जाचे काम उचकटून चांगल्या प्रतिचे काम यापुढे आम्ही करून घेणार आहे. त्याचप्रमाणे, करपडी ते खेडपर्यंतचे डांबरीकरण व दौंड-उस्मनाबाद या रस्त्याचे काम काही दिवसांतच सुरू करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर यांनी दिले.
वीज वितरणकडे वायरमन कुंडलिक कानगुडे यांचा प्रस्ताव वरिष्ठाकंडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे. राशीनसह परिसराची वीज थकबाकी १ कोटी ११ लाख वसुली असली, तरी वीज ग्राहकांकडून सक्तीची होणार नाही, परंतु ग्राहकांनी भरण्याचे सहकार्य करावे, असे आश्वासन वीज वितरणचे शाखा अभियंता संदीप जाधव यांनी दिले.
यानंतर, रास्तारोको आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मारुती काळे, सागर म्हात्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. या आदोंलनाला मनसेचे प्रसाद मैड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाजीराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुभाष जाधव, भाजपाचे तात्यासाहेब माने, संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम, दीपक थोरात, दादा परदेशी, डॉ.विलास राऊत, पवन जांभळकर, अमोल जाधव, अतुल साळवे, नितीन शेटे, डॉ.गणेश रेणूके, डॉ.विजय चव्हाण, ओंकार उकिर्डे, अशोक जंजीरे, हर्षल आढाव, युक्रांदचे विनोद सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
....
फोटो-१२भिगवण रस्ता रोको
...
ओळ- राशीन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता दुरुस्ती व वीजप्रश्नी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद मैड आदी.