लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : श्रीगोंदा, नगर तालुक्याच्या सीमारेषेवर व आडवळणी असलेल्या कोरेगावमध्ये बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे या युवकांनी पाणी टंचाईवर मात दीड एकरात गोविंदबन कृषी टुरिझम केंद्र सुरू केले. अवघ्या तीन वर्षांत कोरेगावचे कृषी पर्यटन गुगल मॅपवर झळकले आहे. यामुळे कोरडवाहू शेतीत आनंदाचे रंग भरू लागले आहेत.
बाळासाहेब मोहारे यांचे बंधू औरंगाबाद ते नगर या मार्गावर पेपर वाहतूक करीत होते. रस्त्यावरील सुरती गुळभेंडी आणि दूध मोगरा हुरडा विक्रीचा त्यांनी अभ्यास केला. स्वत:च्या कोरडवाहू शेतात सुरती ज्वारी पेरण्याचा निर्णय घेतला. कृषी टुरिझमबाबत घरच्यांशी चर्चा केली, पण त्यांच दुर्दैवाने निधन झाले.
मात्र, बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे यांनी शशीकांतचे स्वप्न साकार होण्यासाठी दीड एकरात नारळ, पेरू, पपई, केळी आणि विविध फुलांची शेती केली. लहान मुलांसाठी खेळण्या व शिवार फेरीसाठी बैलगाडी तयार केली. साकळाई डोंगर पायथ्याशी गोविंदबन कृषी टुरिझम केंद्राच्या माध्यमातून ओयासिस फुलविले आहे. २०१७ पासून हुरडा चटण्या इतर गावरान आणि घरगुती शाकाहारी जेवणावर ताव मारण्यासाठी शहरी भागातील चोखंदळ हौशी नागरिकांचा ओढा कोरेगावकडे सुरू झाला. तीन वर्षांपूर्वी कृषी पर्यटकांची पसंती वाढत आहे. त्यातून मोहारे व साबळे परिवारास रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. इतर युवक शेतकरी मित्रांनी कृषी पर्यटन शेतीकडे वळून तोट्यातील शेतीला नवा चेहरा चेहरा दिला, तर निश्चितच अर्थकारणाचा चेहरा स्मार्ट होईल, हे निश्चित आहे.
.....
स्व.शशीकांत मोहारे यांची कृषी पर्यटन टुरिझम सेंटर करण्याची मूळ कल्पना होती. तिला चांगला प्रतिसाद लाभला. शशीकांत असता, तर हे टुरिझम आज वेगळेच असते.
-बाळासाहेब मोहरे, दादासाहेब साबळे, कोरेगाव.
...
मोहारे व साबळे यांनी जिरायती भागात कृषी पर्यटन टुरिझम सुरू करून शेतीला व्यवसायाचे स्वरूप दिले. इतर शेतकऱ्यांनी अशा कृषी पर्यटन शेतीकडे वळण्याची गरज यामध्ये मोठी संधी आहे.
- पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा.
....
१७श्रीगोंदा पयर्टन
...
ओळी-श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे या युवकांनी उभारलेल्या गोविंदबन कृषी टुरिझम केंद्रात आनंद लुटताना पर्यटक.