अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: फटाक्याची स्टॉल लावण्यासाठी मागणी करणाऱ्यांकडून आठशे रुपयांची लाज घेताना संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मधुकर यादव यास लासलुतपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री रंगेहात पकडले.
तक्रारदार यांना दीपावली निमित्त निबाळे फटाका स्टॉल चालू करण्याकरिता संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमानपत्राची आवश्यकता होती.त्यासाठी तक्रारदार संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गेले होते. तेंव्हा असता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी एक हजार रुपयांची मागणी दरम्यान तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लातूर प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या पथकाने सापळा रचला. तडजोडीअंती ८०० रुपयाची लाज येताना पीएसआय पथकाच्या जाळ्यात अडकला. दरम्यान संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.