sangamner Assembly Election 2024 Result Live Updates :संगमनेरविधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे सुरुवातीलाच धक्कादायक कल समोर आला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी आघाडी घेतली आहे. यावेळी मनसेकडून योगेश सूर्यवंशी रिंगणात असल्याने मतदारसंघात पहिल्यांदाच तिरंगी लढत रंगली आहे. अटीतटीच्या या लढतीत बाळासाहेब थोरात वर्चस्व राखणार की शिवसेना गुलाल उधाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड आहे. नगर जिल्ह्यातील राजकारण हे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दिग्गज घराण्यांच्या भोवती फिरत आले आहे. दोन्ही घराण्यांचे सहकार चळवळीत मोठे योगदान आहे. कधीकाळी काँग्रेसमधील सोबती असणारे थोरात आणि विखे आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. संगमनेरविधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसला तरी सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी विखे पाटलांनी जोर लावला आहे. यामुळे बाळासाहेब थोरांतासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना १ लाख २५ हजार ३८० हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना ६३१२८ मते मिळाली होती. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.