अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या यशात गुणवंत अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा आदर्श पुरस्काराने उचित सन्मान होणे आवश्यकच आहे. दरवर्षी २४ एप्रिलला होणाºया पंचायत राज दिनी जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कर्मचाºयांचा गौरव व्हावा, यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले़जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद आदर्श कर्मचारी पुरस्कारांचे वितरण अध्यक्षा विखे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, अनिल कराळे, शरद नवले, रामभाऊ साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सुभाष कराळे, विकास साळुंखे, किशोर शिंदे, राजू म्हस्के, शिवाजी भिटे, भाऊसाहेब मोरगे आदी उपस्थित होते.माध्यमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकारी मल्हारी कचरे, सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक रामचंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग संगमनेर येथील वरिष्ठ सहाय्यक अशोक कदम, पंचायत समिती संगमनेर येथील कनिष्ठ सहाय्यक चेतन चव्हाण, सामान्य प्रशासन विभागातील वाहन चालक संजय बनसोडे, परिचर फैय्याज तांबोळी, पूनम उदावंत यांना त्यांच्या कुटुंबीयांसह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकाºयांसह कर्मचाºयांनीही उत्कृष्ट कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली़अधिकारी, कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्यातील कलागुण, छंद यासाठीही आवर्जून वेळ द्यावा़ त्यामुळे त्यांच्या कामाचा गुणात्मक दर्जा आणखी वाढण्यास मदत होईल, असे विखे म्हणाल्या़
गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गौरवासाठी तरतूद करणार : शालिनी विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:58 PM