शेवगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवारी शहरातील व्यापाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक बोलाविली. कोरोनाकाळातील शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्यासह व्यापारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी २६ जूनला दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील, तसेच शनिवार व रविवारी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
---
कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दुकानात लावा
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या दुकानदारांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दुकानात लावावे. दुकानदारांनी नियमित तोंडाला मास्क लावावे. नियम मोडणाऱ्या १४७ दुकानांवर तर चार हजार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.