71 कोटींचं दान पडलं महागात; शिर्डीत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:06 PM2018-06-30T13:06:03+5:302018-06-30T13:47:09+5:30

शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासमोर ठिय्या आणि विडंबन आंदोलन केल्यानंतर शिर्डी शहरातून अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

Shirdi villagers take out the symbolic funeral of the trust board | 71 कोटींचं दान पडलं महागात; शिर्डीत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

71 कोटींचं दान पडलं महागात; शिर्डीत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

शिर्डी : राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांना ७१ कोटीचे दान साईबाबा संस्थाननं दिल्यामुळं शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संस्थानच्या रुग्णालयात सुविधा नाहीत. त्यामुळं  ग्रामस्थांनी संस्थानचा निधी बाहेर देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध करत साईबाबा विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. 
आज सकाळी शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासमोर ठिय्या आणि विडंबन आंदोलन केल्यानंतर शिर्डी शहरातून अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. साईबाबा संस्थानचा निधी बाहेर देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला. साईमंदिरापासून रुग्णालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थानाच्या रुग्णालयात सुविधांचा वाणवा असताना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला ७१ कोटी दिल्याने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Web Title: Shirdi villagers take out the symbolic funeral of the trust board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.