राहाता : राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द विनयभंग करून धमकी दिल्याबाबत राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माझ्या अल्पवयीन मुलगी रस्त्याने येताना व जाताना आरोपी सागर लुटे गेल्या महिनाभरापासून तिला टोमणे मारून लज्जास्पद, अश्लील बोलतो, तसेच जर तू मोबाईल घेतला नाही, तर तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी देतो. त्याकडे दुर्लक्ष केले असता त्याने बुधवार १४ फेब्रुवारीस दुपारी १२ वाजता राहाता बस स्थानकात मुलीस पुन्हा धमकी दिल्याचे पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार ए. व्ही. गंगलवाड पुढील तपास करीत आहेत.यापूर्वी राहाता नगरपालिकेतील आरोग्य कर्मचा-यांना धमकावल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नगरसेवक लुटेविरूद्ध दाखल झालेला आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी लुटेच्या हद्दपारीची नोटीस बजावली आहे. याबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे.
राहात्यातील शिवसेना नगरसेवक लुटेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 8:09 PM