एकाच दिवसात १३६६ पॉझिटिव्ह,नगर शहरात ३८० रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:24 PM2020-09-14T22:24:58+5:302020-09-14T22:25:29+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात नऊशे रुग्ण आढळल्याचे रेकॉर्ड होते. सोमवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार ३६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ ठरल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी आणखी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात नऊशे रुग्ण आढळल्याचे रेकॉर्ड होते. सोमवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार ३६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ ठरल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी आणखी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३८०), संगमनेर (७५), राहाता (१२४), पाथर्डी (६१), नगर ग्रामीण (१४७), श्रीरामपूर (६७), नेवासा (७७), पारनेर (१९), अकोले (५८), राहुरी (११०), कोपरगाव (७५), जामखेड (५८), श्रीगोंदा (३८), पारनेर (३४),शेवगाव (९), कर्जत (३५)येथील बाधितांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून आले असून एका दिवसात ३८० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याखालोखालनगर तालुका, राहाता, नेवासा, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे.
सोमवारी ८३५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यामध्ये, नगर शहर २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रामीण ५१, श्रीरामपूर ५८, भिंगार १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ३ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या ४ हजार ६७७ इतकी आहे.
-------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : २६,९९१
उपचार सुरू असलेले रूग्ण :४,६७७
मृत्यू : ४९५
एकूण रूग्ण संख्या :३२,१६३