‘गुरुकुल’ चे सामाजिक भान अभिमानास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:49+5:302021-08-29T04:21:49+5:30
अहमदनगर : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गुरुकुल मंडळातील शिक्षक कोरोनाने पतीवियोग झालेल्या बहिणींच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहिले. गुरुकुलचे हे सामाजिक भान ...
अहमदनगर : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गुरुकुल मंडळातील शिक्षक कोरोनाने पतीवियोग झालेल्या बहिणींच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहिले. गुरुकुलचे हे सामाजिक भान अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढले.
गुरुकुल समितीने रक्षाबंधनाचे निमित्त साधून कोरोनाने पतीवियोग झालेल्या महिलांना निचित यांच्या हस्ते दोनशे साड्या भेट दिल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिक्षकनेते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर, संजय धामणे, संतोष भोपे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, जिल्हा समन्वयक,अशोक कुटे, राजेंद्र ठाणगे, वृषाली कडलग, इमाम सय्यद, राजेंद्र पट्टेकर, गजानन जाधव, भास्कर नरसाळे, गणपत देठे, शिवाजी रायकर, सुखदेव मोहिते, संजय नळे, प्रल्हाद साळुंके, किशोर हारदे, अशोक कानडे, मिलिंद पोटे बाळासाहेब काशीद, कैलास ठाणगे, संजीवनी दौंड आदी उपस्थित होते.
निचित म्हणाले, गुरुकुलने आत्महत्याग्रस्त शेतकरी व पूरग्रस्त गावांना मदत केली. कोरोना सेंटरला ऑक्सिजन कन्स्ट्रेक्टर मशीन भेट दिले. यातून या मंडळाचा मानवतावादी चेहरा दिसून येतो. विद्यार्थी घडवण्याबरोबर गुरुकुल मधील शिक्षकांनी, प्रत्यक्ष कृतीतून फक्त शिक्षक नव्हे तर आम्ही समाज शिक्षक असल्याचे सिद्ध केले आहे. अशा शिक्षकांचा समाजाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
एकल महिलांना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी एकाच दिवसात दोनशेच्या वर नव्या साड्या जमा झाल्या. यात गुरुकुलच्या महिलाही मागे राहिल्या नाहीत. कर्जत तालुक्याने सर्वात जास्त साड्यांची भेट दिली.
कार्यक्रमासाठी मधुकर मैड, भिवसेन चत्तर, अंबादास मंडलिक, अतुल वडे, ऋषी गोरे, प्रवीण थोरात, जालिंदर गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वागत दत्ता जाधव यांनी केले. आभार बी. के. बनकर यांनी मानले. सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे यांनी केले.
............
भावाप्रमाणे पाठीशी उभे राहू
कोरोनामुळे आपत्ती कोसळलेल्या महिलांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, शिक्षकनेते संजय कळमकर, संजय धामणे व इतर कार्यकर्त्यांना राख्या बांधल्या. तेव्हा त्यांच्याबरोबर सभागृहातील उपस्थितांचे डोळेही पाणावले. कधीही हाक द्या, आम्ही तुमच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राह, असा भावनिक धीर गुरुकुल समितीच्या नेत्यांनी एकल महिलांना दिला.
..............
२७ संजय कळमकर