सोमय्या महाविद्यालय ई-डाटाबेस सर्चिंगमध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:56+5:302021-04-14T04:18:56+5:30
कोपरगाव : राष्ट्रीय लायब्ररी आणि माहिती सेवा मूलभूत सुविधा शैक्षणिक सामग्री या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने दरवर्षी ई-पुस्तके, ई-जर्नल्सडेटाबेस एन-लिस्टचा ...
कोपरगाव : राष्ट्रीय लायब्ररी आणि माहिती सेवा मूलभूत सुविधा शैक्षणिक सामग्री या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने दरवर्षी ई-पुस्तके, ई-जर्नल्सडेटाबेस एन-लिस्टचा वापर करणाऱ्या महाविद्यालयातून टॉपटेन महाविद्यालय निवडले जाता. चालू वर्षी टॉप-टेन महाविद्यालयात कोपरगाव शहरातील सोमय्या महाविद्यालयाची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
जे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना ऑनलाइन ई-जर्नल्स्, ग्रंथ, लेख, निबंध आधी साहित्य उपलब्ध करत असते. त्यामुळे देशभरातील ३,२२० महाविद्यालय या संस्थेचे सभासद आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संशोधकांनी आपापल्या विषयानुसार त्यांच्या संशोधन कार्यासाठी तसेच संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यासाठी या डेटाबेस चा वापर केला. हे. या डेटाबेसचा वापर कसा करावा, यासाठी ग्रंथपाल नीता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, संदीप रोहमारे यांनी प्राचार्य, ग्रंथपाल व सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले आहे.