एकनाथ शिंदे पारनेरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर; २२ कुटुंबाना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:04 PM2023-04-11T15:04:29+5:302023-04-11T15:09:17+5:30

वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.

State CM Eknath Shinde today inspected the damage in Parner taluka of Ahmednagar district | एकनाथ शिंदे पारनेरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर; २२ कुटुंबाना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे आदेश

एकनाथ शिंदे पारनेरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर; २२ कुटुंबाना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे आदेश

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची आज बांधावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. सरकार तुमच्यासोबत असून लवकरात लवकर तुम्हाला मदत केली जाईल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून या गरीब शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला. या पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी‌ करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घरकुल घरे उपलब्ध करून देण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. 

अवकाळी पावसाने या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, या शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच शेतकरी बांधवांशी बोलताना, पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवडाभरात नुकसान भरपाई देऊ असे सांगून आश्वस्त केले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला १० किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही केले. 

Web Title: State CM Eknath Shinde today inspected the damage in Parner taluka of Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.