दूध आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न; नगर जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती खराब; खासदार सुजय विखे यांची पालकमंत्र्यांवर टीेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 02:44 PM2020-08-01T14:44:31+5:302020-08-01T14:45:12+5:30
दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली.
पारनेर : दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली.
दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव मिळाला पाहिजे. वीज बील माफ करा. खतपुरवठा सुरळीत करा. दूध भुकटीला ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला पाहिज आदी विविध मागण्यांसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) पारनेर येथील आंबेडकर चौकात आंदोलन केले. याप्रसंगी खासदार विखे बोलत होते.
केंद्र सरकारकडून जर या प्रश्नाबाबत अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यातील सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हे तीन पक्षाचे सरकार आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळ हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचे चित्रच महाराष्ट्रात पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले, अशी टीका विखे यांनी केली.
विनामास्क फिरणा-या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा
सध्या पारनेर तालुक्यात एक महिन्यांपासून विविध उद्घाटनांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी विनामास्क जाहीरपणे फिरत आहेत. तर दुसरीकडे आम्ही शेतक-यांच्या दूध प्रश्नांसाठी शनिवारी आंदोलन केले. यावेळी आम्हाला प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे विनामास्क फिरणा-या लोकप्रतिनिधींवर आधी गुन्हे दाखल करावेत. प्रशासन कारवाईबाबत दुटप्पीपणा करीत आहे. त्यामुळे महाआघाडीकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे विखे यावेळी म्हणाले.