राज्यस्तरीय योगासन स्पर्धा होणार ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:01+5:302021-02-24T04:23:01+5:30
योगासनांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संगमनेरात रेफरी (पंच) प्रशिक्षणाचा तीन दिवसांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यातून तीन हजारांहून ...
योगासनांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संगमनेरात रेफरी (पंच) प्रशिक्षणाचा तीन दिवसांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यातून तीन हजारांहून अधिक योगासन प्रशिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर देशभरात राज्यनिहाय ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यात महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या माध्यमातून २२ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत २२ व २३ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ फेरी, २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत उपांत्यपूर्व सामने, ११ व १२ मार्च रोजी उपांत्य सामने व १४ मार्च रोजी अंतिम सामने होणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने इतक्या व्यापक प्रमाणात बहुधा पहिल्यांदाच होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी व संयोजक सतीश मोहगावकर यांनी नियोजन केले आहे.