परिश्रम करणाऱ्याच्या पदरात यश हमखास पडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:19+5:302021-07-17T04:17:19+5:30
कोपरगाव येथील संजीवनी प्री कॅडेट सेंटरमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ...
कोपरगाव येथील संजीवनी प्री कॅडेट सेंटरमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे होते. यावेळी व्यासपीठावर सेंटरचे वरिष्ठ अधिकारी अशोक थोरात उपस्थित होते.
जाधव म्हणाले, प्रशिक्षणास प्रवेश घेतलेले सर्व भाग्यवान आहेत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये शारीरिक व बौद्धिक क्षमता असतात. त्यांच्याकडील संपत्तीला योग्य आकार मिळाल्यास ते यशस्वी होतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस, डिफेन्स, रेल्वे क्षेत्रातील भरती पारदर्शक आहे. भविष्यात कोणाकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्पर्धेतूनच निवड झाली पाहिजे, ही जिद्द मनात ठेवावी.
कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागातील नवतरूण कमी संख्येने सैन्यदलात भरती होतात, ग्रामीण भागातील कुटुंबे सक्षम होतील, या विचारधारेतून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भास्कर यांनी तर डी. के. कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. व्ही. तिवारी, एम.व्ही. मुरडनर व नामदेव केदार यांनी परिश्रम घेतले.
.............
फोटो१६- जाधव, कोपरगाव