रोप स्किपींग स्पर्धेत महर्शी स्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:54+5:302021-02-13T04:19:54+5:30

कोपरगाव : आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धा नुकत्याच ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण १७ ...

Success of Maharshi School in Rope Skipping Competition | रोप स्किपींग स्पर्धेत महर्शी स्कूलचे यश

रोप स्किपींग स्पर्धेत महर्शी स्कूलचे यश

कोपरगाव : आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धा नुकत्याच ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण १७ सीबीएसई शाळेतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्शी स्कूलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत १९ वयोगटात सहभाग घेतला होता. यात वैयक्तिक प्रकारात श्लोक अतुल कोताडे याने सिंगल बाउंन्स या प्रकारात व्दितीय क्रंमाक मिळविला. तर ओम उमेश गोसावी याने स्पिड इण्डयुरन्स या प्रकारात व्दितीय क्रंमाक मिळविला, तसेच साई महेश गोसावी याने स्पिड स्प्रिन्ट या प्रकारात चतुर्थ क्रंमाक मिळविला आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सर्व यशस्वी खेळाडुंचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण, विश्वस्थ बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे. के. दरेकर व सर्व शिक्षकांनी कौतुक केले. क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके, गणेश वाकचौरे, योगेश बिडवे, प्रिया बोधक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो१२- महर्शी स्कूल, कोपरगाव

.........

Web Title: Success of Maharshi School in Rope Skipping Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.