पब्जीच्या आहारी गेल्याने आयटी इंजिनिअरची गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:24 PM2019-07-04T12:24:12+5:302019-07-04T12:46:04+5:30
तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राहुल नानासाहेब पवार (वय २८) यांनी बुधवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.
श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राहुल नानासाहेब पवार (वय २८) यांनी बुधवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पब्जी गेमच्या आहारी गेल्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचे ते चिरंजीव होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले राहुल यांनी शेती करण्याचा मार्ग पत्करला. पोल्ट्री व्यवसायामध्ये ते उतरले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दरम्यान, पब्जी गेमच्या आहारी गेल्यानेच त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने हा खेळ खेळत होते. पब्जीमुळे आत्महत्या केल्याची अशा स्वरुपाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी रमजान ईदच्या दिवशी आंबी येथे एका युवकाने आत्महत्या केली होती. श्रीरामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.