राहाता तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:06 PM2019-11-01T12:06:14+5:302019-11-01T12:06:45+5:30

कर्ज बाजारीपणाला कंटाळून गोगलगांव (ता.राहाता ) येथील तरुण शेतक-याने गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली.

Suicide of young farmers due to debt trading in Rahata taluka | राहाता तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतक-याची आत्महत्या

राहाता तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतक-याची आत्महत्या

लोणी : सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गोगलगांव (ता.राहाता ) येथील तरुण शेतक-याने गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली.
रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता. रवींद्र्र याला एक भाऊ आहेत. दोघा भावात मिळून रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता. त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. गोगलगाव येथे गेल्या ६ महिन्यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे.

Web Title: Suicide of young farmers due to debt trading in Rahata taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.