रविवारी १११ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:29+5:302020-12-29T04:19:29+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १११ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर ९९ रुग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. ...
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १११ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर ९९ रुग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.८८ टक्के झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११०१ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६६ आणि अँटिजन चाचणीत २२ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १३, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ०१, श्रीगोंदा ०२, मिलिटरी हॉस्पिटल ५, अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १६, अकोले १, कर्जत १, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ४, पारनेर ४, पाथर्डी ३, राहता ४, राहुरी २, संगमनेर ७, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ४, इतर जिल्हा ९ येथील रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन चाचणीत आज २२ जण बाधित आढळून आले. यामध्ये, जामखेड ३, कोपरगाव ७, नेवासा १, पाथर्डी ८, राहाता २, संगमनेर १, अशा रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी ९९ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहर २०, कर्जत ३, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ४, पारनेर १, पाथर्डी २०, राहाता ७, राहुरी १, संगमनेर २५, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर २, अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १०३६ आहे, तर कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६८ हजार ५१८ झाला आहे.