श्रीरामपुरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना गहू, तांदळाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:45+5:302021-05-14T04:19:45+5:30
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये कुणाही गरीब कुटुंबांची ...
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये कुणाही गरीब कुटुंबांची अन्नधान्यावाचून अडचण होऊ नये म्हणून पुरवठा विभागाचा आमदार कानडे यांनी नुकताच आढावा घेतला. तसेच काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन माहिती घेतली. गावोगावच्या ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन दुकानांमध्ये उपलब्ध झालेले धान्य लाभार्थ्यांनी घेऊन जावे म्हणून जागृती करणे आवश्यक आहे. तसेच कामगार तलाठी आणि ग्रामसेवक यांनी धान्य दुकानांना भेटी देऊन गर्दी न करता लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आमदार कानडे यांनी केल्या आहेत.
प्राधान्य कुटुंबांसाठी प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ आणि अंत्योदय कुटुंबांना प्रति कुटुंब ३५ किलो धान्य या प्रमाणे देण्यात आला आहे. याच कुटुंबांना पंतप्रधान योजनेमधूनही तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ या प्रमाणात धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. म्हणजेच मे महिन्यात या सर्व लाभार्थी कुटुंबांना दुप्पट धान्य मिळणार आहे, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.