महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:20 AM2021-03-27T04:20:41+5:302021-03-27T04:20:41+5:30
देवळाली प्रवरा : परिसरात महावितरणने वीज बिल वसुलीसाठी ट्रान्सफार्मर बंद केल्याने शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
देवळाली प्रवरा : परिसरात महावितरणने वीज बिल वसुलीसाठी ट्रान्सफार्मर बंद केल्याने शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घातला.
राहुरी तालुक्यातील आरडगाव, टाकळीमिया, मोरवाडी परिसरात वीज बिल वसुली होत नसल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे लाईट कनेक्शन बंद करण्यात आले. मात्र शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. गुरुवारी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महावितरणने तातडीने वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आनंद वने, सतीश पवार, सुनील इंगळे, दत्तात्रय गोसावी, शहाजी मोरे, रमेश मोरे, विजय मोरे, सुनील नालकर, संजय कड ,अभिजित कड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
..
फोटो-२६देवळाली घेराव
..
ओळ-वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.