जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल; भाजप-राष्ट्रवादीचे समसमान बल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:48 PM2020-07-03T13:48:12+5:302020-07-03T13:48:59+5:30
जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऐनवेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रा.सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन व भाजप दोन असे समसमान सदस्य संख्या झाली आहे.
जामखेड : पंचायत समिती सभापती निवडीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऐनवेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रा.सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन व भाजप दोन असे समसमान सदस्य संख्या झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.३ जुलै) केवळ निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सभापती निवडीला स्थगिती आहे. निवडणूक प्रक्रिया दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सभापती निवड प्रक्रिया होत आहे. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजश्री मोरे, भाजपाकडून मनिषा सुरवसे यांनी सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपचे डॉ.भगवान मुरूमकर यांनी नागरिकांचा मागासप्रवर्ग मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तीन वाजता छाननी होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे या काम पहात आहेत. सभापतीनिवडीकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.